अकोट (अकोला) -अकोट तालुक्यातील वरूर जऊळका या गावात माकडांनी उच्छाद घातला होता. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले होते त्यांनी वनविभागाला कळवूनही काहीच कारवाई होत नव्हती. ग्रामस्थांनी याबाबत वनमंत्री संजय राठोड यांना माहिती दिली. वनमंत्र्यांनी तत्काळ अमरावती मुख्य प्रधान वनसंरक्षक यांना आदेश दिले. त्यानुसार एक पथक या गावात दाखल झाले आणि त्यांनी माकडांना पकडून जेरबंद केले.
माकडांचा बंदोबस्त करण्याचे वनमंत्र्यांचे आदेश; अधिकाऱ्यांच्या तत्काळ कारवाईने गावकऱ्यांना दिलासा
माकडांच्या त्रासामुळे नागरिकांनी वनविभागाला सांगूनही कारवाई होत नसल्याने त्यांनी ही बाब वनमंत्री संजय राठोड यांना सांगितली. मंत्र्यांच्या आदेशानंतर यंत्रणा कामाला लागली.
वरूर जऊळका गावात गेल्या काही दिवसांपासून माकडांचा त्रास नागरिकांना होत होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. वनविभागाला सांगून ही कारवाई होत नसल्याने त्यांनी ही बाब वनमंत्री संजय राठोड यांना सांगितली. त्यांनी तत्काळ अमरावती प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना आदेश दिल्यानंतर वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. या पथकाने माकडांचा पकडून बंदोबस्त केला.
तसेच माकडांच्या हल्ल्यात जखमी झालेले सतीश काठोळे याना उपचारासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे वनविभागाने सांगितले.