अकोला -पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेषांतर करून जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा विक्रीचा भांडाफोड केला होता. यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून प्रतिबंधित गुटखा विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, पालकमंत्री कडू यांनी यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात आमच्या विभागाचा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट नमूद केले आहे.
बच्चू कडूंचे पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
पालकमंत्री बच्चू कडू यांनी 21 जून रोजी वेषांतर करून जिल्ह्यातील अकोला, पातूर, बार्शीटाकळी गुटखा खरेदी केला. तसेच त्यांनी राशन दुकानातून विनाकार्ड राशन मिळविण्याचा प्रयत्न केला. प्रतिबंधित गुटखा त्यांना सहज भेटला. त्यासोबतच गुटखा विक्रीसंदर्भात त्यांनी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले.
'अधिकाऱ्यांचा कारवाईसाठी कानाडोळा'