महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमआयडीसीतील ऑईल कंपनीला आग; अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण - एमआडीसीत ऑइल कंपनीला आग

भैया ऑटोमोटिव्ह ऑईल कंपनीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऑइल हा ज्वलनशील पदार्थ असल्याने आग आटोक्यात आणण्यासठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

representational image
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : May 20, 2020, 11:29 AM IST

Updated : May 20, 2020, 12:04 PM IST

अकोला-शहरातील एमआयडीसीमधील अप्पू पॉईंट पॉईंट जवळ असलेल्या जनरल ट्रान्सपोर्ट जवळील भैया ऑटोमोटिव्ह या ऑईल कंपनीला मंगळवारी रात्री आठ वाजता आग लागली. या आगीमध्ये कंपनीतील ऑईल व इतर साहित्य व इतर साहित्य जळाले असून त्यामुळे लाखो रुपयांचे रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत जीवितहानी झाली नसल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या सहाय्याने जवानांनी आग आटोक्यात आणली.

एमआयडीसीतील ऑइल कंपनीला आग

भैया ऑटोमोटिव्ह ऑईल कंपनीचे मालक रियाज खान (रा. खामगाव) यांना कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती माहिती मिळाली. यानंतर त्यांनी अकोला अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ऑईल जळत असल्यामुळे कंपनीतून आगीचे डोंब निघत होते.अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

आग नेमकी लागली कशामुळे लागली कशामुळे याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

Last Updated : May 20, 2020, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details