अकोला - ऑक्टोबर महिना सुरु असताना परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काल दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. दरम्यान, या पावसामुळे शेतातील पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
अकोला : परतीच्या पावसाचा जोर वाढला; शेतकरी चिंताग्रस्त
ऑक्टोबर महिना सुरु असताना परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे शेतात असलेले पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
परतीच्या पावसाचा जोर वाढला
हेही वाचा -पाम तेल आणि दूध पावडरपासून बनवलेली एक लाखांची मिठाई जप्त
परतीचा पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. या वातावरणात आरोग्य खराब होत असल्याने खासगी दवाखांन्यात गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकरीही चिंतातुर झाला. गेल्या दोन दिवसांंपासून ढगाळ वातावरण आहाे.आहे. काढणीला आलेले पीक खराब होण्याची शक्यता आहे. हातातोंडाशी आलेले उत्पन्न जाण्याची भीती आता बळीराजाला सतावू लागली आहे.