अकोला -महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भरपूर पाऊस झाला. परंतु, हा पाऊस सर्वदूर नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली नाही, त्यांनी चांगल्या पावसाची आणखी वाट पाहावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पाऊस पाच ते सहा दिवस लांबला असल्याचे सांगितले आहे. परिणामी, पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शेतकऱ्यांनो पेरणीसाठी चांगल्या पावसाची आणखी वाट पाहा - कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भाले पाऊस लांबला -
जिल्ह्यात सहा जूनपासून पावसाला सुरुवात झाली. दोन ते तीन वेळा जोरदार पाऊस पडला. परंतु, हा पाऊस सर्वदूर नव्हता. ज्या भागात पाऊस चांगला आणि पेरणीयुक्त झाला त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु, त्या भागात आता शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत. पाऊस पाच ते सहा दिवस लांबला असल्याचे हवामान विभाग सांगत आहे.
शेतकरीऱ्यांची पेरणीसाठी घाई-
जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस झाला, अशी परिस्थिती नाही आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 68.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आतापर्यंत पाऊस 74.2 मिमी पाऊस पडला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर या तीन तालुक्यात 70 मिमी पेक्षा जास्त पाऊस (15 जून पर्यंत) झाला आहे. तर अकोट, तेल्हारा, अकोला, बाळापूर या तालुक्यात 65 मिमी जवळ पाऊस पडला आहे. तरीही शेतकरी पेरणीसाठी घाई करीत आहे.
जमिनीत ओलावा नाही पेरणीसाठी पावसाची वाट पाहावी -
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. आतापर्यंत पडलेला पाऊस हा सर्वदूर नाही आहे. तसेच जमिनीत 80 ते 100 मिमी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जमिनीत तीन इंच पेक्षा ओलावा निर्माण झालेला नाही. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. यासोबतच कपाशी आणि सोयाबीन पेरताना शेतकऱ्यांनी पावसाची आणखी वाट पाहावी. शक्यतो इतर पिकानाही शेतकऱ्यांनी पसंती द्यावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले आहे.
अकोला कृषी विद्यापीठात खाकी रंगाच्या कापसाचे उत्पादन, देशातील पहिलाच प्रयोग