महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदारांनी पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या प्रश्नावरुन अधिकाऱ्यांना विचारला जाब - रखडलेले पंचनामे

पंचनाम्यांमध्ये त्रुटी असल्यामुळे अकोट तालुक्यातील केळी व फळ पिकाच्या दाव्याची रक्कम मिळालेली नाही. यामुळे पंचनाम्यातील त्रुटी काढून चार डिसेंबरला अकोट येथील शेतकऱ्यांचे नवे पंचनामे करून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक वाघ यांनी आमदार देशमुख व जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

farmers agitation with mla
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक

By

Published : Dec 2, 2019, 7:58 PM IST

अकोला - रखडलेल्या पिक विमाची रक्कम, पंचनाम्यामधील त्रुटी आणि रखडलेले पंचनामे यांचा अहवाल न झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक वाघ यांना आमदार देशमुख आणि प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत अकोट, तेल्हारा, पातूर आणि बाळापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आणि प्रतिक्रिया

पंचनाम्यांमध्ये त्रुटी असल्यामुळे अकोट तालुक्यातील केळी व फळ पिकाच्या दाव्याची रक्कम मिळालेली नाही. यामुळे पंचनाम्यातील त्रुटी काढून चार डिसेंबरला अकोट येथील शेतकऱ्यांचे नवे पंचनामे करून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक वाघ यांनी आमदार देशमुख व जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच फळपिकांचे पावसामुळे झालेले नुकसानाचे पंचनामे 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचेही जिल्हा कृषी अधीक्षक यांनी यावेळी सांगितले. सोबतच पातूर आणि बाळापूर या दोन तालुक्यातील सन 2017-18 मधील शेतकऱ्यांना मदतीचे पैसे मिळाले नाही. या दोन तालुक्यातील 167 गावांमधील दुष्काळी मदत रखडली असल्याने याबाबत आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही कृषी अधिक्षक वाघ यांनी आमदारांसह उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.

हेही वाचा -पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? ट्विटर हँडलवरुन भाजप हटवले

या बैठकीला शिवसेनेचे दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली अकोट आणि पातुर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा कृषी अधीक्षक आणि प्रभारी जिल्हाधिकारी यांची ही संयुक्त बैठक घेतली होती.

हेही वाचा - 'दंगल गर्ल' अडकली विवाहबंधनात, सात ऐवजी घेतले आठ फेरे!

ABOUT THE AUTHOR

...view details