अकोला - वऱ्हाडी भाषेचा नावलौकिक देशभरात पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाच्यावतीने अकोल्यातील उद्धव शेळके साहित्य नगरीमध्ये वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचा समारोप आज संमेलनाध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख आणि जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या उपस्थितीत झाला.
...तरच वऱ्हाडी प्रत्येक मनापर्यंत पोहोचेल; साहित्य संमेलनाच्या समारोपात आवाहन - varhadi
दोन दिवसीय अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचा समारोप आज झाला. वऱ्हाडी भाषेची बोलण्याची लकब ही जगावेगळी असून ही भाषा बोलताना लाज बाळगण्याची गरज काय, असा सवाल यावेळी संमेलनाध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी उपस्थित केला.
याठिकाणी माजी आमदार तुकाराम बिरकड, वऱ्हाडी कवी अनंत खेळकर यांच्यासह मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रकाश पोहरे यांनी वऱ्हाडी भाषेला आज सातासमुद्रापार सन्मान मिळत असून वऱ्हाडी बोलीभाषा प्रत्येक मनापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मायबोलीत संवाद साधण्याचे आवाहन केले.
वऱ्हाडी भाषेची बोलण्याची लकब ही जगावेगळी असून ही भाषा बोलताना लाज बाळगण्याची गरज काय, असा सवाल संमेलनाध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी उपस्थित केला. दोन दिवसीय वऱ्हाडी साहित्य संमेलनामध्ये कथाकथन, कविसंमेलन,वऱ्हाडी कॅटवॉक, वऱ्हाडी रॅप, जोगवा, वऱ्हाडीतील ऐतिहासिक वास्तूंची चित्रप्रदर्शने अशा भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळाली. साहित्य संमेलनात सहभागी साहित्यिकांचे यावेळी सन्मान करण्यात आले. यासोबतच वऱ्हाडी भाषा संवर्धनासाठी विद्यापीठात वऱ्हाडी भाषा मंडळ स्थापन करणे, वऱ्हाडी ग्रंथालय स्थापन करणे यासह विविध ठराव संमत करण्यात आले.