अकोला - जुन्या शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या शिकस्त इमारतीचा काही भाग आज (दि.३ऑगस्ट) सायंकाळी कोसळला. सुदैवाने, यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर जुने शहर पोलीस, अग्निशमाक दल, महानगरपालिका बांधकाम विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे.
अकोला : जुन्या शहरातील रिकामी शिकस्त इमारत कोसळली; जीवितहानी नाही - अकोला जीवित हानी
जुन्या शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या शिकस्त इमारतीचा काही भाग आज(दि.३ऑगस्ट) सायंकाळी कोसळला. शिकस्त इमारती संदर्भात घरमालकाला महानगरपालिकेने नोटीसही बजावली होती. परंतु, घरमालकाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तीन मजली इमारतीला पूर्णपणे पाडण्याचे काम आता महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.
रिकामी शिकस्त इमारत कोसळली
शिकस्त इमारती संदर्भात घरमालकाला महानगरपालिकेने नोटीसही बजावली होती. परंतु, घरमालकाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ही घटना घडली. या इमारतीत कुणी राहत नसल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, इमारतीत सुरू असलेला विद्युत प्रवाह खंडित करून, या तीन मजली इमारतीला पूर्णपणे पाडण्याचे काम आता महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.