अकोला- दुसऱ्या टप्प्यातील अकोला लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या प्रचारतोफा आज (मंगळवारी) सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. मागील १८ दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आज थांबला. अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १६ उमेदवार असून त्यापैकी १ महिला उमेदवार आहे. या ठिकाणी १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार १८ एप्रिलला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अकोल्यात प्रचार तोफा थंडावल्या, गुरुवारी मतदान - end
दुसऱ्या टप्प्यातील अकोला लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या प्रचारतोफा आज (मंगळवारी) सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. मागील १८ दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आज थांबला.
महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला १९ मार्चपासून सुरुवात झाली. नामनिर्देशन पत्र २६ मार्चला दाखल करण्यात आली. अकोल्यात १ हजार ७५१ मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ मे ला होणार आहे. निवडणुकीत १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ८ लाख ९२ हजार १५९ महिला मतदार आणि ९ लाख ६२ हजार ५७६ पुरुष मतदार आहेत. यापैकी ८५ हजार हे नवीन मतदार वाढले आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि निवडणूक निरीक्षक विनोदसिंह गुंजियाल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडत आहे.