अकोला -किराणा दुकानाच्या आड अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री मुसा कॉलनीमध्ये कारवाई करीत एक किलो 100 ग्रॅम गांजा आणि 70 ग्रॅम चरस असा एकूण 16 हजार रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. फैजान खान लतीफ खान खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव नाव आहे.
दुकानात छापा
रामदास पेठ पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. मुसा कॉलनीत असलेल्या किराणा दुकानात अमली पदार्थ विक्रीला उपलब्ध आहेत. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी दुकानात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी १ किलो 100 ग्रॅम गांजा व 70 ग्रॅम चरस असा 16 हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला.
परिसरात खळबळ
फैजाण खान याच्यावर केलेल्या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पोलिसांनी एनडीपीएसनुसार कारवाई करून त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून अधिक माहिती पोलीस गोळा करीत असून इतरांचा ही समावेश यामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.