महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गरोदर माता व शस्त्रक्रियांसाठी दाखल होणाऱ्यांचीही कोरोना चाचणी घ्या; विभागीय आयुक्तांचे आदेश

विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्तांनी कोविड उपचार सुविधांची माहिती घेतली. तसेच गरोदर माता व शस्त्रक्रियांसाठी दाखल होणाऱ्यांचेही घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

Akola Collector office
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय

By

Published : Jun 12, 2020, 9:52 PM IST

अकोला - गरोदर माता व शस्त्रक्रियांसाठी दाखल होणाऱ्यांचेही घशातील स्त्राव घ्यावे. ज्या भागात पॉझिटीव्ह रूग्ण आढळले त्या ठिकाणाहून १०० ते २०० मिटर परिसरातिल सर्व लोकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले. शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांनी कोविड उपचार सुविधांची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. नेताम, डॉ. राठोड, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.

बाहेर गावाहून येणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाड संख्येवरील निर्बंध अधिक कडक करा. बाळापूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात अधिक कडक उपाययोजना राबवाव्यात. सर्दी, ताप, खोकला या सारख्या आजारांच्या रुग्णांची नियमित तपासणी करावी, असे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी निर्देश दिले. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आरोग्य सेतू अॅप याबाबतही विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details