अकोला- पातूर येथे टँकरमधील डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दुपारी अटक केली. या कारवाईत पथकाने ५ जणांना अटक करताना एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
टँकरमधील डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त - डिझेल चोरी
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दुपारी अटक केली. या कारवाईत पथकाने ५ जणांना अटक करताना एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पातूर येथील नॅशनल धाब्याच्या बाजूला अकबर खान, टँकर चालक, क्लिनर आणि तेथे काम करणारे नोकर संगनमताने अवैधरित्या डिझेल काढून विक्री करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बाहकर यांना मिळाली. त्यामुळे पथकाने छापा टाकताना १ टँकर (एमएच - ३० बीडी - ०७२७) किंमत २० लाख रुपये, टँकरमधील १४ लाख रुपयांचे २० हजार लिटर डिझेल जप्त केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी फयाज बेग, रज्जाक बेग, अब्दुल जावेद अरशीद यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे पेट्रोल विकीचा परवाना नसतानाही ते पेट्रोल विक्री करत होते. हे डिझेल अकबर खान आणि अख्तर खान यांचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या सांगण्यावरून चालक व क्लिनरने मिळून डिझेल टाकीमधून काढले. पोलिसांनी टँकर चालक विजय अनकने, नाजीमोद्दीन अणीसोद्दीन यांनाही अटक केली आहे.