अकोला - मूर्तिजापूर तालुक्यातील एंडली गावातील दादाराव वानखडे हे म्हशींना पाणी पाजण्यासाठी पुर्णा नदीपात्रात गेले होते. त्यावेळी पुर्णा नदीच्या पुरात ते वाहून गेले होते. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने आज (रविवार) त्यांचा मृतदेह दोनवाडा गावाजवळ शोधून काढला.
एंडली गावातील दादाराव वानखडे हे 24 जुलै रोजी पूर्णा नदीजवळ म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यांचा पाय घसरल्याने ते नदीच्या पाण्यात ते वाहून गेले होते. त्यांचा शोध न लागल्याने मूर्तिजापूर तहसीलदार यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दीली. पथकाने घटनास्थळ गाठले आणि त्यांचा शोध सुरू केला.