अकोला- येथील आदर्श कॉलनीतील तीन बंगल्याजवळ एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी घडली. हा परिसर खदान पोलीस ठाण्याअंतर्गत आहे. जखमी महिलेला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. जखमी महिलेचे नाव निशा इंगळे आहे. काही महिन्यांआधी तिचा विवाह झाला होता.
अकोल्यात महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला ; काही महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
आदर्श कॉलनीतून निशा इंगळे ही तिच्या मैत्रीणीसोबत जात होती. त्यावेळी तिथे एक जण आला. आणि त्याने तिच्यावर थेट चाकूने सपासप वार केले.
आदर्श कॉलनीतून निशा इंगळे ही तिच्या मैत्रिणीसोबत जात होती. त्यावेळी तिथे एक जण आला आणि त्याने तिच्यावर थेट चाकूने सपासप वार केले. यावेळी त्याने या महिलेच्या छातीवर, हातावर आणि अंगावर चाकूने वार केले. त्यांनतर ती रक्तबंबाळ झाली. तिच्या मैत्रिणीने आरडाओरडा केली. त्यानंतर खदान पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. ती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या हल्ल्यामागील नेमके कारण काय ? हे अजून समजू शकले नाही.