महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात गॅस सिलिंडरचा उडाला भडका, चौघे जण गंभीर जखमी - हिवरखेड

अकोल्यातील विनोद ताळे यांच्या घरातील गॅसची नळी फुटल्यामुळे गॅस सिलिंडरने पेट घेतला आणि घरात आगीचा भडका उडाला यामुळे चारजण जखमी झाले आहेत.

घरातील छायाचित्र

By

Published : Apr 21, 2019, 12:03 AM IST

अकोला - हिवरखेड येथील बार्गनपुऱ्यात आज सायंकाळी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरने पेट घेतल्यामुळे वृद्ध महिला, ३ वर्षांच्या चिमुकलीसह तिचे आई-वडील भाजले आहेत. दुर्गा ताळे यांनी गॅस पेटवताच आगीचा भडका उडाल्याने ही घटना घडली.

सिलिंडरचा भडका उडालेले घर

विनोद ताळे यांच्या घरातील गॅसची नळी फुटल्यामुळे गॅसचा विसर्ग संपूर्ण घरात झाला होता. याच दरम्यान दुर्गा यांनी गॅस पेटवण्यासाठी आगपेटीची काडी पेटवताच आगीचा भडका उडाला. यावेळी तिथे असलेले विनोद ताळे, वृद्ध देवकाबाई ताळे, आणि त्यांची ३ वर्षांची मुलगी भक्ती ताळे हे सर्वजण भाजले गेले. शेजारच्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या सर्वांना हिवरखेड येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या घटनेबाबत हिवरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details