महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Raut Criticizes BJP : भाजपचा देशाला गुलाम करण्याचा प्रयत्न, काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचा भाजपवर निशाना - Death to Indian democracy

ही लढाई लोकशाहीची आहे, ही लढाई संविधानाची आहे. एकेकाळी या देशाला स्वतंत्रता मिळवण्यासाठी इंग्रजांशी लढलो. आता भाजप आम्हाला गुलाम बनविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा हल्लाबोल आज काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी भाजपवर केला आहे. ते आज अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Nitin Raut
Nitin Raut

By

Published : Mar 31, 2023, 10:33 PM IST

नितीन राऊत यांची भाजपवर टीका

अकोला :या नव्या गुलामांविरुद्ध लढण्याची ही आमची लढाई आहे. ही लढाई आम्ही मोठ्या जिद्दीने लढू. या मोदींना तोंड देऊन आपण शंभर टक्के विजयी होऊ, असा विश्वास नितीन राऊत यांनी व्यक्त केला ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. संसदेच्या पाऱ्यांवर डाेकं टेकवणाऱ्यांकडूनच लाेकशाहीचा पाय खचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी त्यांच्या नेतृत्वात होत आहे. केंद्र सरकार राहुल गांधी यांना झालेली शिक्षा, नंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसने संकल्प सत्याग्रह आंदोलन सुुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

सध्या देशात आणीबाणी :संसदेतील सुरू असलेल्या कामकाजावरून सध्या देशात आणीबाणी सुरू झाली असल्याची खात्री जनतेस पटली आहे, असे राऊत म्हणाले. संसदेत राहुल गांधी यांनी मोदी, अदानी यांचे संबंध काय आहेत, शेल कंपनीत २० हजार कोटी कोणाचे? याबाबत चर्चेची मागणी लावून धरली होती. मात्र, संसदेच्या कामकाजातून भाषणाचा भागच वगळण्यात आला. भाजपने ठरवून २३ मार्च म्हणजे शहीद भगतसिंग यांच्या स्मृतीदिनी भारतीय लोकशाहीलाच फाशी दिली, अशी घणाघाती टीका ही नितीन राऊत यांनी भाजप सरकारवर केली. तसेच माेदी सरकारमध्ये एकूण ८९ सचिवापैकी एकही ओबीसी वर्गातील नाही. या सचिवापैकी फक्त ०३ एसटी तसेच ०१ एससी वर्गातील आहे, असेही ते म्हणाले.

जनतेची दिशाभूल :भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी, सुब्रमण्यम स्वामी , लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नसतांना त्यांना दिल्लीच्या मध्यवर्ती भागामध्ये बंगला देण्यात आला आहे. मात्र, देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष, त्याच्या नेत्याला बंगला खाली करण्याची नवीन निती केंद्र सरकारने अंमलात आणली आहे. महागाई, अडचणीतला शेतकरी, रोजगारासाठी वणवण फिरत असलेला युवक, भारत-चीन सिमेवर आक्रमणाच्या परिस्थितीत असलेला चिनी या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप ही डाॅ. राऊत यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर बोलणे टाळले : महागाई, बेरोजगारी, हवालदिल शेतकरी, सैन्यामध्ये भरती झालेल्या तरुणांना चार वर्षात निवृत्त करण्याचे धोरण आदी ज्वलंत प्रश्न देशासमाेर आहेत. याच प्रश्नांवर राहुल गांधी प्रश्च विचारत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडण घडणीमध्ये प्रश्नांना कोठेही स्थान नाही, अशी टिका त्यांनी केली. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच सावरकर गाैरव यात्रा या मुद्यावरील प्रश्नांवर डाॅ. राऊत यांनी बाेलणे टाळले.

पत्रकार परिषदेला महानगर अध्यक्ष डॉ.प्रशांत वानखडे, जिल्हाध्यक्ष अशाेक अमानकर, शहराध्यक्ष डॉ.प्रशांत गावंडे, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, साजिद खान पठाण, मदन भरगड, प्रदीप वखारिया, निखिलेश दिवेकर, महेंद्र गवई, रवी शिंदे, पूजा काळे, डॉ. .चंद्रशेखर चिंचेलकर, बबनराव चैधरी, महेश गंगणे, प्रमेद डांगरे, महेश बैडखे, आदी उपस्थित होते.

हेही वाचा - Savarkar Issue : सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक, उद्धव ठाकरेंची संयमी भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details