अकोला- दोन दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोला शहरात सभा झाली होती. आता परत एक सभा सोमवारी दुपारी एक वाजता तेल्हारा येथे आयोजित करण्यात आली असून या सभेला मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची ही दुसरी सभा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी तेल्हाऱ्यात सभा - election
भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी अकोला शहरात आले होते. या प्रचार सभेत त्यांनी स्थानिक पेक्षा राष्ट्रीय स्तरावरील कामांची एक एक वैशिष्टे आपल्या भाषणातून व्यक्त केली होती.
भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी अकोला शहरात आले होते. या प्रचार सभेत त्यांनी स्थानिक पेक्षा राष्ट्रीय स्तरावरील कामांची एक एक वैशिष्टे आपल्या भाषणातून व्यक्त केली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसवर त्यांनी टीका करीत भाजपला मतदान करावे, असे आवाहन केले होते.
आता परत संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दुपारी एक वाजता येत आहे. या सभेत ग्रामीण भागातील आणि अकोट विधानसभा मतदार संघातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अकोल्यातील भाषण आणि तेल्हाऱ्यात देण्यात येणारे भाषण हे सारखेच असण्याची शक्यता आता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. परिणामी, या सभेला अकोल्यापेक्षा जास्त गर्दी होईल का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.