अकोला- अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी पारिवारिक चर्चा केली. त्यांच्यासोबत स्थानिक आमदारही उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मुलीचा स्वागत समारोह अकोल्यात आहे. या समारोहासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आदी उपस्थित होते. रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे हे भाजपचे दोन खासदार मोठ्या मताधिक्याने आणि चौथ्यांदा निवडून आल्याने त्यांची भेट घेतल्याचे समजते.