महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भर उन्हाळ्यात ढगाळ वातावरणाने उजळली अकोल्याची पहाट

मे महिना येण्याआधीच अकोल्याचा पारा ४५ अंशाजवळ पोहोचलेला आहे. असे असतानाही आज मात्र अकोल्याची पहाट ढगाळ वातावरणाने उगवली

ढगाळ वातावरणाने उजळली अकोल्याची पहाट

By

Published : Apr 15, 2019, 11:35 AM IST

अकोला - उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये अकोला फारच उष्ण असतो. उन्हाळ्यात अकोलेकर कडक उन्हाचा त्रास आणि चटके यामुळे त्रस्त होऊन जातात. त्यामुळे उन्हाळ्यात अकोल्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणे हा फारच दुर्मिळ योग आहे.

विशेष म्हणजे, हवामान खात्याने दर्शविलेला अंदाजही अकोलेकरांसाठी दर उन्हाळ्यात खोटाच ठरतो. त्यामुळे त्यांच्यासाठी दररोजची पहाट ही उष्ण वातावरणाने उगवते. मात्र, आजची पहाट ही ढगाळ वातावरणाने उजळल्याने पहाटे पहाटे उठून सूर्याकडे पाहणाऱ्यांनाही आश्चर्यचकित करून गेली. गेल्या आठ दिवसांचे हवामान पाहिले तर अकोल्याचे किमान तापमान २७ अंशाच्या वर गेले आहे. रविवारी अकोल्याचे तापमान हे ४४.८ अंश होते.

ढगाळ वातावरणाने उजळली अकोल्याची पहाट

मे महिना येण्याआधीच अकोल्याचा पारा ४५ अंशाजवळ पोहोचलेला आहे. असे असतानाही आज मात्र अकोल्याची पहाट ढगाळ वातावरणाने उगवली. या वातावरणाने अकोलेकरांना आश्चर्यचकित केले असले तरी हे ढगाळ वातावरण किती काळ राहील, असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. पहाटे ढगाळ वातावरण आणि दुपारी गरम उन्हाचे चटके असाही वातावरणाचा रुबाब राहू शकतो, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details