महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वेतन निश्चितीसाठी शिक्षकांकडून पैशाची मागणी भोवली; चार कनिष्ठ सहायक निलंबित

शिक्षकांचे वेतन निश्चित करण्यासाठी शिक्षकांना चार कनिष्ठ सहायकांनी पैशांची मागणी केली होती. यामुळे अकोला पंचायत समितीमधील चार कनिष्ठ सहायकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले.

जिल्हा परिषद

By

Published : Apr 28, 2019, 12:04 AM IST

अकोला- सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चित करण्यासाठी शिक्षकांना चार कनिष्ठ सहायकांनी पैशांची मागणी केली होती. यामुळे अकोला पंचायत समितीमधील चार कनिष्ठ सहायकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज निलंबित केले. पी. एम. मोहोड, डी. ए. महल्ले, पी. के. चंदेल, सय्यद रिजाजउद्दिन, असे निलंबीत केलेल्या सहायकांची नावे आहेत.

जिल्हा परिषद


अकोला पंचायत समिती स्तरावर 7 व्या वेतन आयोगानुसार शिक्षकांचे वेतन निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वेतन निश्चित करताना अकोला पंचायत समितीमधील शिक्षण विभागात कार्यरत काही कर्मचारी शिक्षकांना प्रत्येकी तीनशे पन्नास रुपयांची मागणी करत होते. त्यामुळे यासंबंधी गटविकास अधिकारी राहुल शेळके व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे अकोला पंचायत समिती येथील शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक पी. एम. मोहोड, डी. ए. महल्ले, पी. के. चंदेल, सय्यद रिजाजउद्दिन यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिले.


चौकशीनंतर कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याला शिक्षकांकडून घेतलेले 50 हजार रुपये व दुसऱ्या कर्मचाऱ्याने 15 हजार रुपये आयुष्य प्रसाद यांच्याकडे आणून दिली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details