अकोला - सराफ व्यावसायिकाने 4 कोटी 57 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ( Kotwali Police Station Akola ) दाखल करण्यात आली आहे. यामध्ये मुंडगावकर ज्वेलर्सच्या ( Mundgavkar Jewells ) मालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आज सोपविण्यात आला.
हुंडा चिठ्ठीच्या नावावर व विश्वास ठेऊन आमच्या घामाचे पैसे आम्ही मुंडगावकर ज्वेलर्स यांच्याकडे दिले होते. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यांचे दुकानही बंद आहे. त्यामुळे आमची फसवणूक केली आहे, अशी तक्रार वजा अर्ज तक्रारकर्त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिला आहे. यामध्ये सुरुवातीला 12 तक्रारकर्ते यांच्यापेक्षा जास्त जणांचा समावेश आहे. पोलिसांनी चौकशी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या अर्जामध्ये आणखी अर्जदारांची नावे वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अवैध सावकारी आणि फसवणुकीनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
अशी आहेत आरोपीची नावे -
तक्रारकर्त्यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जामध्ये सहा जणांवर आरोप केला आहे. यामध्ये विजय ओंकार पिंजरकर (मुंडगावकर), अमोल विजय पिंजरकर, सविता अमोल पिंजरकर, उदय विजय पिंजरकर, किरण उदय पिंजरकर, मुनिमजी राजू ठाकूर यांच्या नावाचा समावेश आहे.