महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चौपदरीकरनाच्या खोदलेल्या जागेत फसली बस; कोणतीही जीवितहानी नाही - bus trapped in pit in akola

तेल्हारा डेपोची बस क्रमांक (एम.एच. ४० एन. ८०१२) ही अकोल्याकडे जात होती. ही बस निमकरदा गावाजवळील रस्त्याने जात होती. या रस्त्याच्या कडेला खोदलेल्या जागेत ही बस उतरल्याने ती फसून गेली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

खड्ड्यात फसलेली बस

By

Published : Sep 5, 2019, 5:53 PM IST

अकोला- जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरनाचे काम सुरू होऊन थांबले आहे. या डांबरी रस्त्याच्या कडेला खोदून ठेवलेल्या खड्ड्यात वाहने फसत आहे. असाच प्रकार निमकरदा गावजवळ घडला. येथे रस्त्याच्या कडेला खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बस फसली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

चौपदरीकरनाच्या खोदलेल्या जागेत फसली बस

तेल्हारा डेपोची बस क्रमांक (एम.एच. ४० एन. ८०१२) ही अकोल्याकडे जात होती. ही बस निमकरदा गावाजवळील रस्त्याने जात होती. या रस्त्याच्या कडेला खोदलेल्या जागेत ही बस उतरल्याने ती फसून गेली. त्यामुळे या अपघातात बसमधील प्रवाशांना काय झाले हे कळलेच नाही. बसमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांनी अक्षरशः बसच्या खिडकीतून उड्या मारल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. बसमध्ये फसलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बसच्या खिडकीचा उपयोग करावा लागला. या अपघातामुळे वाहतूक कोलमडली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details