महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हे सरकार दहशतवादी, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडेंचा सरकारवर निशाणा - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात ईडीकडून गुन्हा नोंदवल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले. भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

By

Published : Sep 25, 2019, 7:35 PM IST

Updated : Sep 25, 2019, 8:38 PM IST

अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याचा आरोप करत सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना धमकावण्याचा प्रकार होत आहे. आचरसंहिता असताना भाजपने हा राजकीय डाव खेळला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी आज केला.

गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात ईडीकडून गुन्हा नोंदवल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले. त्याच्या प्रतिक्रियाही राज्यभरात उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आदी नेत्यांवर ईडीने कारवाई केली. ज्या गोष्टींशी शरद पवार यांचा काडीचाही संबंध नाही. त्या प्रकरणात सहभाग असल्याचे दाखवत त्यांना गोवण्यात आले आहे. भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात गुन्हे दाखल करणे म्हणजे विरोधकांना प्रचारापासून दूर ठेवण्याचा घाट असल्याचेही गावंडे यावेळी म्हणाले. याबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सागितले आहे.
Last Updated : Sep 25, 2019, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details