अकोला - केटरिंगच्या मालकाकडे चोरी करणाऱ्या बिर्याणी वस्तादला रामदास पेठ पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख दोन हजारांची रोकड जप्त केली आहे.
पोलिसांनी चार लाख दोन हजारांची रोख जप्त केली आहे. आसिक शहाबाद खान यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. ते कामानिमित्त कारंजा लाड येथे गेल्यानंतर घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने चार लाख दोन हजारांची रोकड लंपास केली. आसिक शहबाज खान घरी आल्यानंतर त्यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तत्काळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू आसिक शाहबाज खान यांच्यासोबत राहणाऱ्या सलमान शेख रियाज मोहम्मदला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरी केल्याचे कबूल केले. सलमान शेख हा आसिक यांच्यासोबत केटरिंगच्या व्यवसायात आहे. तो बिर्याणीचा वस्ताद म्हणून काम करतो. त्याची ही चोरी पहिलीच चोरी असल्याचे तपासात समोर आले.
दरम्यान, रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पद्मने, प्रशांत इंगळे, शेख हसन शेख अब्दुल्ला व अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.