अकोला- पेट्रोल पंपाजवळ दुचाकी पेटल्याने शहरात एकच खळबळ उडाली. अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंपाजवळ आज (शुक्रवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीचालकाने जीवावर खेळून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या मदतीने गाडीला लागलेली आग विझवण्यात आली.
पेट्रोल पंपाजवळ दुचाकीने घेतला पेट; चालकाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न - अकोला
अनिकेतचे आग विझविण्याचे प्रयत्न पाहून बघणाऱ्यांनी त्यास दुचाकीपासून दूर होण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने स्वतःच्या जीवावर खेळत दुचाकीची आग विझविली.
बाहेरगावी जाण्यासाठी अनिकेत सव्वालाखे आणि त्याचा मित्र दुचाकी क्रमांक (एमएच २७ बीआर ४४४२) ने जात होते. अशोक वाटिका पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर दुचाकीच्या मागे बसलेल्या मित्राला चटका लागला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकी पेट्रोल पंपातून ओढून बाहेर काढली. आग विझविण्यासाठी त्याने रेती आणि फायर सेफ्टी सिलेंडरचा मारा केला. तर, काहींनी जवळ असलेल्या पाण्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.
अनिकेतचे आग विझविण्याचे प्रयत्न पाहून बघणाऱ्यांनी त्यास दुचाकीपासून दूर होण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने स्वतःच्या जीवावर खेळत दुचाकीची आग विझविली. अनिकेत सव्वालाखे यांच्याकडे असलेली दुचाकी ही त्याच्या मित्राची आहे. त्याने गावाला जाण्यासाठी दुचाकी घेतली होती. परंतु, आग लागल्याने तो घाबरला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कार्यालयात बोलावून धीर दिला.