अकोला - जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील रुईखेड येथील शेतात अस्वल आढळून आली. त्यामुळे शेतमजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात वनविभागाने योग्य ती कारवाई करून वन्य प्राण्यांपासून शेतमजुरांची सुरक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अकोल्यात केळीच्या शेतात अस्वलांचा मुक्त संचार, शेतकऱ्यांमध्ये भीती - आकोट
रुईखेड गावातील सुनील ठाकरे यांच्या शेतातील केळीच्या बाहेत गेल्या २ दिवसापासून अस्वल दिसत आहे. त्यामुळे त्याठिकाणी काम करण्यासाठी शेतमजूरही धजावत नाही.
केळीच्या शेतात आढळलेली अस्वल
आकोट तालुक्यातील अनेक गावे सातपुड्याच्या पायथ्याशी आहेत. या गावातील नागरिकांच्या शेती ही त्याच परिसरात आहे. सातपुड्याच्या जंगलात पाणवठे कोरडे असल्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलाकडून गावाकडे येत आहेत. रुईखेड गावातील सुनील ठाकरे यांच्या शेतातील केळीच्या बाहेत गेल्या २ दिवसापासून अस्वल दिसत आहे. त्यामुळे त्याठिकाणी काम करण्यासाठी शेतमजूरही धजावत नाही.