महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंदला हिंसक वळण; पातूरमध्ये दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीमार - अकोला बंदला हिंसक वळण

बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पातूर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. परंतु, शहरातील मुख्य चौकातील येणाऱ्या बसवर जमावाने दगडफेक केली. तसेच खासगी वाहन, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली.

bharat band partur Akola
पातूरमध्ये बंदला हिंसक वळण

By

Published : Jan 29, 2020, 5:02 PM IST

अकोला - बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या पार्श्वभूमीवर पातूर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, शहरातील मुख्य चौकात येणाऱ्या बसवर जमावाने दगडफेक केली. तसेच खासगी वाहन, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ परिस्थिती निवळण्यासाठी लाठीमार करीत मोर्चेकऱ्यांची धरपकड केली.

पातूरमध्ये दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीमार

बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पातूर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. परंतु, शहरातील मुख्य चौकातील येणाऱ्या बसवर जमावाने दगडफेक केली. तसेच खासगी वाहन, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ परिस्थिती निवळण्यासाठी लाठीमार करीत मोर्चेकऱ्याची धरपकड केली.

हेही वाचा -भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल भाजपमध्ये

या दगडफेकीत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, अकोला शहरातही मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मोर्चा संपल्यावर व्यापाऱ्यांनी दुकाने परत उघडली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा -मोदी सरकारच्या काळात एनजीओला विदेशातून मिळणाऱ्या देणग्यांचा उच्चांक

ABOUT THE AUTHOR

...view details