अकोला- बाळापूर तालुक्यातील हातरुन येथे औषधांचे दुकान चालविणारे तथा भाजप व्यापारीप्रमुख सुभाष अग्रवाल यांना अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी मारहाण केली. हे हल्लेखोर मंगळवारी रात्री त्यांच्या दुकानात शिरले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांनी मारहाण केली. दुकानातील गल्ल्यातील 20 हजार रुपये लुटून नेले. याप्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हातरुन येथे मंगळवारी आठवडी बाजार होता.
उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातरून येथील भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात सुभाष अग्रवाल जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. सुभाष अग्रवाल हे त्यांच्या मेडिकल स्टोअरमध्ये बसले होते. यावेळी दोन अज्ञात युवकांनी त्यांना मारहाण करत चाकूच्या धाकावर अंदाजे 20 हजार रुपये लुटून नेले.