महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट व दूरस्थ संपर्कातील ४०० व्यक्ती निरीक्षणात

जिल्ह्यात एकूण १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या निकटवर्तीयांना तसेच संपर्कात आलेल्या जवळपास ४०० व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

akola corona news
पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट व दूरस्थ संपर्कातील ४०० व्यक्ती निरीक्षणात

By

Published : Apr 14, 2020, 8:25 PM IST

अकोला - जिल्ह्यात एकूण १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या निकटवर्तीयांना तसेच संपर्कात आलेल्या जवळपास ४०० व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये ६० व्यक्ती अत्यंत निकट संपर्कातील आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील एका रुग्णाच्या संपर्का आलेल्या दोघांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट व दूरस्थ संपर्कातील ४०० व्यक्ती निरीक्षणात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अकोल्यात पहिल्या टप्प्यात दोन जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील पहिल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील १४ व्यक्ती होत्या. तर दूरस्थ संपर्कातील ३० व्यक्ती होत्या. तसेच अन्य व्यक्तींच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील १० जणांचे अहवाल प्राप्त असून तिघे पॉझिटिव्ह, तर अन्य सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ३० व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अकोल्यातीलच दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कातील आठ व्यक्ती होत्या. त्यातील सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ४९ जणांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट व दूरस्थ संपर्कातील ४०० व्यक्ती निरीक्षणात

त्यानंतर बाळापूर येथून दाखल झालेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या (मृत) निकट संपर्कात पाच जण होते. त्या पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीदेखील त्यांना संस्थागत अलगीकरणात तर, अन्य २२ व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पातूर येथील सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांच्या निकट संपर्कात असलेल्या ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दूरस्थ संपर्कातील २३९ जणांचेही गृह अलगीकरण करण्यात आले असून ३१ जण अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संस्थागत अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या अत्यंत निकट संपर्कात ६० जण होते. तर दूरस्थ संपर्कात ३४० जण आल्याचे प्रशासनाने शोधून काढले. हे सर्व जण सध्या संस्थागत तसेच गृह अलगीकरणात असून ते वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details