अकोला - राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. सरकारने राज्यातील चारही कृषी विद्यापीठात सातवा वेतन लागू करावा, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कर्मचारी उद्या सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वी आज सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला होता.
सातव्या वेतन आयोगासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. परिणामी, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये हीच परिस्थिती आहे. या वेतनासाठी चारही विद्यापीठातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत लेखणीबंद आंदोलन केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शहीद स्मारकासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. परिणामी, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये हीच परिस्थिती आहे. या वेतनासाठी चारही विद्यापीठातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत लेखणीबंद आंदोलन केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शहीद स्मारकासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली. यानंतर ही मागणी मान्य न झाल्यास वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून सरकारकडून सातवा वेतन आयोग मिळवून घेण्याचा निर्धार यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला होता. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला. सरकार विरोधी नारेबाजी करीत सातवा वेतन आयोग मिळवून घेऊ, असा निश्चय केला. या आंदोलनानंतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव यांना निवेदन सादर केले आहे.