अकोला - तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर येथे घरमालक व त्यांच्या पत्नीला बांधून एक लाख 78 हजारांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांना चांगलीच शर्थ करावी लागली. शेवटी तेल्हारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून या दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून देशी पिस्तुल, दोन जीवंत काडतूस व साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असलम उर्फ अहमद शहा यासिन शहा, मुस्कान बी असलम शहा असे अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
दरोडा टाकणाऱ्या दोघांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश
अकोट शहर, अकोट ग्रामीण, तेल्हारा, हिवरखेड, दहीहंडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी नाकाबंदी करून शेगाव नाक्याकडून घोडेगावपर्यंत पाठलाग केला. पळसोद फाटा येथे दुचाकीवर पळणाऱ्या या दोघांना पोलिसांनी थांबविले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुस आदी मुद्देमाल मिळाला.
वाडी अदमपूर येथील ताराचंद बजाज यांना मारहाण करून त्यांच्या घरातून 20 सप्टेंबरच्या रात्री चोरी झाली. दोन चोरट्यानी एक लाख 78 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरटे हे काळ्या रंगाच्या दुचाकीवर शेगाव नाका याकडे वेगाने गेल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश दिले. अकोट शहर, अकोट ग्रामीण, तेल्हारा, हिवरखेड, दहीहंडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी नाकाबंदी करून शेगाव नाक्याकडून घोडेगाव पर्यंत पाठलाग केला. पळसोद फाटा येथे दुचाकीवर पळणाऱ्या या दोघांना पोलिसांनी थांबविले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळून एक गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतुस आदी मुद्देमाल मिळाला. चौकशीमध्ये या दोघांची नावे असलम उर्फ अहमद शहा यासिन शहा, मुस्कान बी असलम शहा समोर आली. त्याच्या शिवणी येथील घर झडतीमध्ये पाच लाख 50 हजारांचा सोन्या चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल मिळून आला. या दोघांनाही तेल्हारा पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.