अकोला - शहरातील मुख्य रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात आज सकाळी एक दुचाकी पडली. यासोबतच दुचाकीवरील वडील आणि मुलगी दोघेही पडल्याने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. यानंतर स्थानिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. हा खड्डयाचा आकार एवढा मोठा आहे, की संपूर्ण दुचाकी यामध्ये अडकली.
ज्या खड्ड्यात ही दुचाकी पडली त्या खड्ड्यातून मात्र पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत होता. जेल चौक ते अग्रेसन चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता कच्चा झाल्याने सर्वत्र खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते.