महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला महापालिकेचा बाजारपेठेतील अतिक्रमणावर हातोडा

अकोला महापालिकेच्यावतीने शहरातील अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमण काढण्याला किरकोळ व्यावसायिकांनी विरोध केला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे अतिक्रमण हटवण्याचा मार्ग मोकळा झाला.

Akola

By

Published : Jul 7, 2019, 11:38 AM IST

अकोला - अकोला महापालिकेच्यावतीने शहरातील गांधी रोड ते जैन मंदिर, खुले नाट्यगृह आणि सरकारी गोदाम परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. रस्त्यावर विक्री करणाऱ्या किरकोळ व्यवसायिकांनी मोहिमेला विरोध केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी केल्याने लगेच वातावरण शांत झाले.

अतिक्रमण हटाव मोहिम

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सिटी कोतवाली ते गांधीरोड ते जैन मंदीर रोड, खुले नाट्य गृह ते फतेह चौक, काला चबुतरा परिसर, इंदौर साडी गल्ली येथील अतिक्रमण काढण्यात आले. वाहतुकीस अडथळे निर्माण करणारे चार चाकी गाड्यांचे अतिक्रमण काढण्याात आले. कारवाईला व्यवसायिकांनी विरोध करताच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण लगेच शांत झाले.

सरकारी गोदामाच्या बाजुला बिट्टीसेठ ले-आउट मधील संरक्षक भिंती, ओटे आणि पाय-यांचे अतिक्रमण काढण्यात आली आहेत. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे नरेंद्र घनबहादुर, प्रवीण मिश्रा आणि अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details