अकोला - तक्रारदाराला जमीन मिळवून देण्यासाठी व गुन्ह्यातील नाव कमी करण्यासाठी किनगाव राजा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार यास तीन हजार रुपयांची लाच घेताना आज(गुरुवार) अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तीन हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास अटक, अकोला एसीबीची कारवाई - akola acb arrested a police constable news
तक्रारदाराला जमीन मिळवून देण्यासाठी व गुन्ह्यातील नाव कमी करण्यासाठी किनगाव राजा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार यास तीन हजार रुपयांची लाच घेताना आज(गुरुवार) अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील डोरवी राहत असलेल्या 24 वर्षीय तक्रारदार याच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जामीन मिळावा व गुन्ह्यातील नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराला किनगाव राजा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बक्कल नंबर 1470 दत्तात्रय बाजीराव लोढे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर अकोला एसीबीने आज पडताळणी केली. त्यानंतर तक्रारदार यांना पोलीस हवालदार लोंढे याने किनगाव राजा बस स्थानकाजवळ बोलावले. त्यानंतर तिथे दबा धरून बसलेल्या अकोला एसीबीने पोलीस हवालदार लोंढे याने तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्विकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई अकोला एसीबी उपअधीक्षक एसएस मेमाणे यांच्या पथकाने केली.