अकोला -श्रावणबाळ योजनेचे कार्ड बनवून देण्यासाठी 3 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या एका खासगी व्यक्तीवर अकोला लाचलुचपत विभागाने सोमवारी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात कारवाई केली. वृद्ध महिलेकडून 2 हजार रुपये स्वीकारताना आरोपीला अटक केली आहे. सुहास मारोती ढोके, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे सर्वोपचार रुग्णालयातील खासगी व्यक्तीच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
वृद्ध महिलेकडून 2 हजारांची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीला एसीबीने केली अटक हेही वाचा -अकोल्यात भाजीबाजाराला आग; 20 दुकानांमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक
65 वर्षीय तक्रारदार महिलेला श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला आणि इतर सर्व कामे करून देण्यासाठी आरोपी ढोकेने वृद्ध महिलेला पैशाची मागणी केली. आरोपीनेया कामासाठी 3 हजार रुपयांच्या लाच मागितली. 2 हजार रुपये रोख आणि खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर उरलेल्या 1 हजार रुपयांची त्याने मागणी केली. वृद्ध महिलेला ही रक्कम देणे योग्य न वाटल्याने तिने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
हेही वाचा -सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे 50 हजारांची फसवणूक करणार्या नायजेरियन व्यक्तीला अटक
या तक्रारीची दखल घेत एसीबीने 9 फेब्रुवारीला तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीनंतर ठरलेल्या ठिकाणी शासकीय सर्वोपचार रुग्णालय येथील बाह्यरुग्ण विभागाच्या नोंदणी कक्षासमोर एसीबीने सापळा लावला. त्यावेळी आरोपी ढोके हा तिथे आला. त्याने त्या वृद्ध महिलेकडून 2 हजार रुपये लाच स्वीकारली. यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.