500 रूपयांची लाच घेणाऱ्या रोजगार सेवकाला अटक - anti corruption bureau akola
दोन मस्टरचे बिल काढून देण्यासाठी रोजगार सेवकाने 500 रूपयांची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकाला अकोला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. ही कारवाई मूर्तिजापूर येथील एका चहा टपरीमध्ये करण्यात आली.
500 रूपयांची लाच घेणाऱ्या रोजगार सेवकाला अटक
अकोला -500 रूपयांची लाच घेणाऱ्या एका रोजगार सेवकाला अकोला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या मजुरांनी घरांचे बांधकाम करताना मजुरी केली त्यांचे दोन मस्टरचे बिल काढून देण्यासाठी रोजगार सेवकाने 500 रूपयांची मागणी केली होती. ही कारवाई मूर्तिजापूर येथील एका चहा टपरीमध्ये करण्यात आली.