महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात मंगळवारी 5 जण कोरोनामुक्त; नवीन 9 पॉझिटिव्ह - 9 नवीन कोरोना रुग्ण न्यूज

मंगळवारी सायंकाळी पाच जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यातील चौघे कलाल की चाळ व एक फतेह चौक येथील रहिवासी आहेत. हे पाचही जण २८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाले होते.

akola hospital
शासकीय वैद्यकीय रुग्णालय, अकोला

By

Published : May 13, 2020, 12:01 PM IST

अकोला- मंगळवारी सायंकाळपर्यंत नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर, आनंदाची बातमी म्हणजे पाच कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक दीड वर्षाचा बालक, एक आठ वर्षाचा मुलगा, एक ६२ वर्षीय व्यक्ती तर एक २३ वर्षीय महिला असून हे सर्व जण भवानी पेठ तारफ़ैल या भागातील रहिवासी आहेत. मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच रुग्णांपैकी तीन महिला व दोघे पुरुष आहेत. ते खैर मोहम्मद प्लॉट, भीमनगर व तिघेजण गवळीपूरा या भागातील रहिवासी आहेत.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाच जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यातील चौघे कलाल की चाळ व एक फतेह चौक येथील रहिवासी आहेत. हे पाचही जण २८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाले होते.

मंगळवारी प्राप्त अहवाल - ८ पॉझिटिव्ह, ९ निगेटिव्ह

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१६८, मृत- १४(१३+१), डिस्चार्ज -१९, दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १३५

ABOUT THE AUTHOR

...view details