महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात 28 जणांची कोरोनावर मात; जिल्ह्यात अॅक्टीव्ह रुग्ण ९३ - maharashtra corona update

अकोल्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच बरे झालेल्यांची संख्यादेखील वाढत आहे. गुरुवारी २८ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

अकोला कोरोना न्यूज
अकोल्यात 28 जणांची कोरोनावर मात; जिल्ह्यात अॅक्टीव्ह रुग्ण ९३

By

Published : May 15, 2020, 3:07 PM IST

अकोला- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. कोरोनातून बरे झालेल्या 28 रुग्णांना गुरुवारी रात्री घरी सोडण्यात आले आहे. तर आज शुक्रवारी एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे.


तपासणीसाठी पाठवलेल्या ९६ अहवालापैकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा 35 वर्षीय युवक खडकी येथील निसर्ग सोसायटीत राहतो. इतर 95 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यासोबतच गुरुवारी रात्री २८ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यातील चार जणांना घरी पाठवले आहे. तर उर्वरित २४ जणांना कोविड केअर सेंटर येथे पुढील १४ दिवस ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाची सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- २०८
मृत - १५(१४+१)
डिस्चार्ज- १००
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ९३

ABOUT THE AUTHOR

...view details