अकोला- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आज सकाळी 11 आणि सायंकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत 21 ने वाढ झाली आहे. दरम्यान, आज 119 जणांचे अहवाल तपासण्यात आले होते.
अकोल्यात आज २१ कोरोना पॉझिटिव्ह; दिवसभरात 119 जणांची तपासणी - अकोला कोरोना अपडेट्स
पॉझिटिव्ह आढळलेल्या दहा रुग्णांपैकी तीन जण आंबेडकर नगर, तर अन्य माळीपुरा, फिरदोस कॉलनी, खदान, सिटी कोतवाली, सिव्हिल लाईन्स, मोमीनपुरा, नेहरू नगर येथील रहिवासी आहेत. त्यात सात पुरुष आणि तीन महिला आहेत.
आतापर्यंत 207 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यासोबतच दोन सफाई कामगार आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या दहा रुग्णांपैकी तीन जण आंबेडकर नगर, तर अन्य माळीपुरा, फिरदोस कॉलनी, खदान, सिटी कोतवाली, सिव्हिल लाईन्स, मोमीनपुरा, नेहरू नगर येथील रहिवासी आहेत. त्यात सात पुरुष आणि तीन महिला आहेत.
आज प्राप्त अहवाल - ११९
पॉझिटिव्ह-२१
निगेटिव्ह-९८
सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२०७
मृत - १५(१४+१),
डिस्चार्ज-७२
दाखल रुग्ण (ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १२०