अकोला- आज तपासण्यात आलेल्या 95 तपासणी अहवालानुसार दोन अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत, तर 93 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत 220 कोरोना पॉझिटिव्ह असले तरी त्यापैकी शंभर जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 1043 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर 16 जणांचा मृत्यू आणि एकाने आत्महत्या केलेली आहे.
अकोल्यात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत एकूण 220 कोरोनाबाधित
आज पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्ण महिला असून त्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झालेल्या आहेत. त्या २१ व २२ वर्षांच्या असून त्यातील एक फिरदौस कॉलनी तर अन्य मेहरुन्नीसा फंक्शनल हॉल लकडगंज येथील रहिवासी आहेत.
आज पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्ण महिला असून त्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झालेल्या आहेत. त्या २१ व २२ वर्षांच्या असून त्यातील एक फिरदौस कॉलनी तर अन्य मेहरुन्नीसा फंक्शनल हॉल लकडगंज येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत जिल्हा स्त्री रुग्णालयातून चार महिला रुग्ण बाधित झालेले आहेत. त्यामुळे या रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांवर रुग्णालय प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.
आज प्राप्त अहवाल - ९५
पॉझिटिव्ह - दोन
निगेटिव्ह - ९३
आता सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - २२०
मृत - १७ (१६+१),
डिस्चार्ज - १००
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १०३