अकोला - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केल्याच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे. आज 17 रुग्ण कोरोना विषाणूवर मात करीत आपल्या घरी सुखरूप परतले आहेत. आतापर्यंत एकशे सतरा रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत.
अकोल्यात 17 रुग्णांची कोरोनावर मात, आतापर्यंत 117 जणांना 'डिस्चार्ज' - कोरोनाचा वाढता धोका
आतापर्यंत जिल्ह्यात 252 कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 117 रुग्णही सध्या उपचार घेत आहेत. तसेच, 117 रुग्णांची प्रकृती बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कंचनपूर, अंत्री, पिंजर, उगवा या गावांमध्ये पोहोचलेला कोरोना आता मुर्तिजापूर शहरातही पोहोचला आहे. त्यामुळे या शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाच्या आजूबाजूचा परिसर सील करून तिथे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 252 कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 117 रुग्णही सध्या उपचार घेत आहेत. तसेच, 117 रुग्णांची प्रकृती बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.