अकोला- बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज छापा टाकला. या कारवाईत २४ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी १७ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये ३ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुगार खेळणाऱ्या १७ जणांना अटक; पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त - crime
बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज छापा टाकला. या कारवाईत २४ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी १७ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये ३ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
विशेष पथकाने बार्शीटाकळी शहर आणि जांभरून गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकला. १७ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरीत ७ जणांचा शोध पोलीस घेत आहेत. या छाप्यात दुचाकी, रोख रक्कम, मोबाईलसह ३ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यात प्रल्हाद देवराम तिवरे, रामजी भिकाजी लोखंडे, महादेव आनंदा खुळे, केशव भोजू शिंदे, शेख नसीरोद्दीन शेख रफीवोद्दीन, नामदेवराव बढुजी सावळे, तुकाराम ज्ञानदेव दुतोंछडे, राजू किसन जावळे, विजय सहदेव सरदार, ज्ञानदेव संपत अभोरे, शाम शालीग्राम चव्हाण, यशवंत समरत शिरसाठ, अनिल मारोती मनवर, रामदास सुखदेव दोनोडे, अर्जुनसिंह रंजितसिह राठोड, मुकिंदा जगदेव गवई, शहाबाज खा मैताब खा या १७ आरोपीना अटक केली आहे. तर नामदेव बुगाजी गिऱ्हे, बाळू पाटील उर्फ दादाराव पाटील आणि इरफान ख्वाजासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.