अकोला- जिल्ह्यातील 22 जण विदेशातून आलेले आहेत. त्यांची कोरोनासंदर्भात थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली आहे. त्यापैकी सहा जणांचा चौदा दिवसांचा कालावधी संपला आहे. तर उर्वरीत 16 जण हे 'होम क्वॉरंटाईन' आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिली.
कोरोना व्हायरस: अकोला जिल्ह्यातील 16 रुग्ण 'होम क्वॉरंटाईन'
सहा जणांचा चौदा दिवसांचा कालावधी संपला आहे. तर उर्वरीत 16 जण हे 'होम क्वॉरंटाईन' आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिली.
16-patients-from-akola-district-home-quarantine
आतापर्यंत जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. तसेच क्वाॅरंटाईन वॉर्ड आणि आयसोलेशन वार्डमध्ये सगळ्यांची तपासणी करण्यात येत आहे. गरज पडल्यास खासगी रुग्णालयांमध्येही तपासणी करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयातील गर्दीवर अंकुश लावण्यासाठी त्या-त्या व्यवस्थापनाला कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
Last Updated : Mar 16, 2020, 11:52 PM IST