अकोला - अकोल्यात सकाळी ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. सायंकाळी आलेल्या अहवालात हा आकडा सहाने वाढला असून आजची एकूण रुग्ण संख्या ही 14 वर पोहोचली आहे. दिवसभरात 158 जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यापैकी 144 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अकोल्यात आज १४ कोरोनाबाधित आढळले; पातूरमधील एका रुग्णाचा समावेश
आजची एकूण रुग्ण संख्या ही 14 वर पोहोचली आहे. दिवसभरात 158 जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यापैकी 144 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या सहा अहवालात एक महिला व पाच पुरुष आहेत. यात जुने शहर, अकोट फैल, गोकुळ कॉलनी जवाहर नगर, मलकापूर अकोला, हमजा प्लॉट वाशिम बायपास येथील रहिवासी आहेत, तर एक रुग्ण हा पातूर शहरातील मुजावरपुरा येथे आढळला आहे.
पातूर शहरात परत रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. पातूर येथील आधीचे सात रुग्ण हे बरे होऊन घरी गेले होते. त्यानंतर परत रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. अकोल्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 355 वर पोहोचली असून 126 रूग्ण हे अॅक्टिव्ह आहेत, तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. 206 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत.