अकोला- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. अकोल्यात आज सकाळी १२ जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १० रुग्णांचा समावेश आहे. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अकोल्यात नव्याने १२ जण कोरोनाबाधित; एकूण आकडा १ हजार ७९१ वर - अकोला कोरोना अपडेट
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार, नऊ महिला व तीन पुरुष कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील तीन जण अकोट येथील, तेल्हारा, बोरगाव व पारस येथील प्रत्येकी दोन तर सातव चौक, बाळापूर व वाशिम बायपास येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार, नऊ महिला व तीन पुरुष कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील तीन जण अकोट येथील, तेल्हारा, बोरगाव व पारस येथील प्रत्येकी दोन तर सातव चौक, बाळापूर व वाशिम बायपास येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, उपचार घेताना वाशिम बायपास येथील ६० वर्षीय महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. या महिलेस ३० जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते.
सकाळच्या प्राप्त अहवालानुसार...
प्राप्त अहवाल- २०९
पॉझिटीव्ह- १२
निगेटीव्ह- १९७
जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती...
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १७९१
मृत- ९१ (९०+१)
डिस्चार्ज- १३३३
ॲक्टीव्ह रुग्ण- ३६७