अहमदनगर - नेवासा तालुक्यातील देवगाव येथील एका महिलेने घरकुलाच्या यादीतून नाव वगळल्याने ग्रामपंचायतीसमोरच आपला संसार थाटला आहे. या प्रकाराला तीन दिवस उलटून गेलेत. मात्र, प्रशासनाने अजूनही याची दखल घेतलेली नाही.
महिलेने चक्क ग्रामपंचायतीसमोर थाटला संसार... घरकुलाची मागणी - उपोषण
शबरी आवास योजनेच्या घरकुल यादीतून जाणीवपूर्वक नाव वगळल्याचा आरोप करत नेवासा तालुक्यातील देवगाव येथील अपंग आणि विधवा महिला आशाताई ज्ञानदेव गायकवाड यांनी देवगाव ग्रामपंचायतीसमोर बुधवार (17 जुलै) पासून उपोषण सुरु केले आहे.
शबरी आवास योजनेच्या घरकुल यादीतून जाणीवपूर्वक नाव टाळल्याचा आरोप करत नेवासा तालुक्यातील देवगाव येथील अपंग आणि विधवा महिला आशाताई ज्ञानदेव गायकवाड यांनी देवगाव ग्रामपंचायतीसमोर बुधवारी 17 जुलै पासून उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र, तरीही प्रशासन लक्ष देत नसल्याने या महिलेने थेट आपला संसार आता ग्रामपंचायती समोर मांडला आहे.
विशेष म्हणजे, भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गावातच हा प्रकार घडला आहे. आशाताईने अनेकदा ग्रामपंचायत, पंचायत समितीत हेलपाटे मारले. मात्र, त्यांना प्रशासनाकडून केवळ उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याचे आशाताई गायकवाड यांनी सांगितले आहे.