महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेल्फीच्या मोहाने गमाविला जीव; गोदावरी नदीच्या पात्रात पडून नवविवाहितेचा मृत्यू - गोदावरी नदी नेवासा न्यूज

पुलाच्या कठड्याजवळ सेल्फी घेताना महिलेचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली. उपस्थितांनी तात्काळ धावपळ करून तिला पाण्याबाहेर काढले. तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले.

गीता जाधव
गीता जाधव

By

Published : Dec 2, 2020, 3:02 PM IST

नेवासा (अहमदनगर) - सेल्फी काढताना धोकादायक ठिकाणी काढल्यास जीव गमवावा लागतो, हे अधोरेखित करणारी घटना पुढे समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रात पडून 21 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला आहे. गीता शंकर जाधव असे मृत महिलेचे नाव आहे.

गीता जाधव ही आपल्या भावासह नेवासा येथे आपल्या सासरी जात होती. औरंगाबाद ते नेवासा मार्गात कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून जाताना गीता यांना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. फोटो घेण्यासाठी तिने भावाला थांबविले. पुलाच्या कठड्याजवळ सेल्फी घेताना तिचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली. उपस्थितांनी तात्काळ धावपळ करून तिला पाण्याबाहेर काढले. तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा-माजी रणजी क्रिकेटपटू सेल्फी घेताना कोसळला दरीत!

आठ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह-

मृत महिलेचा 8 महिन्यापूर्वी औरंगाबाद येथील तरुणाशी विवाह झाला होता. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना काळाने अचानक घाला घातला. गीता यांचा अचानक मृत्यू झाल्याने खैरे व राऊत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रामहरी चाटे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

हेही वाचा-रेल्वेवर चढून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात 15 वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नदीसारख्या खोल पाण्याच्या ठिकाणी, इमारतीसारख्या उंच ठिकाणी व रेल्वेच्या दरवाज्यात अशा धोकादायक ठिकाणी काढू नये, असे तज्ज्ञ नेहमी सल्ला देतात.

ABOUT THE AUTHOR

...view details