अहमदनगर - टाटा सुमो आणि दुचाकी गाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका शिक्षिकेचा अंत झाला आहे. ही घटना शेवगाव - अमरापूर रस्त्यावर भगूर येथे घडली. शिक्षिकेच्या पतीला अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे शिक्षक दाम्पत्य लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण पूर्ण करून पाथर्डीकडे परतत होते.
दुचाकी आणि चारचाकीच्या धडकेत शिक्षिका ठार, अहमदनगरमधील घटना - accident
पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालय येथील विनोदकुमार गांधी आणि त्यांच्या पत्नी भक्ती गांधी हे दोघे शेवगावहून पाथर्डीकडे दुचाकीवर परतत होते. समोरून येणाऱ्या सुमोची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.
पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालय येथील विनोदकुमार गांधी आणि त्यांच्या पत्नी भक्ती गांधी हे दोघे शेवगावहून पाथर्डीकडे दुचाकीवर परतत होते. समोरून येणाऱ्या सुमोची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात भक्ती गांधी यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांना उपचारासाठी अहमदनगरला आणले जात होते. पण, त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. विनोद गांधी यांची प्रकृती स्थिर असून नगरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.