महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली. पूजा मयूर नाईक (वय 20) असे या विवाहितेचे नाव आहे. पूजाच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला आहे.

याच कांद्याच्या चाळीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली

By

Published : Aug 30, 2019, 6:01 PM IST

अहमदनगर - सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली. पूजा मयूर नाईक (वय 20) असे या विवाहितेचे नाव आहे. पूजा यांनी ब्राह्मणगाव येथील राहत्या घरी कांद्याच्या चाळीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोपरगाव तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
ही घटना आज (शुक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पूजाच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला आहे. त्यामुळे विवाहितेची आत्महत्या की हत्या? हे गूढ कायम आहे. दरम्यान या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत पूजा हिचा विवाह मयूर उर्फ गणेश नाईक याच्यासोबत 17 महिन्यांपूर्वी झाला होता. त्यांना एक 6 महिन्यांचा मुलगा देखील आहे. पूजाचा वेळोवेळी सासरकडून मानसिक छळ केला जात होता, असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पूजाचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका माहेरच्या मंडळींनी घेतली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details