महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंदोरीकर महाराज राजकारणात? अहमदनगरमध्ये चर्चेला उधाण - इंदोरीकर महाराज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने जिल्ह्यात आले असता संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर उद्योजक संजय मालपाणी आणि प्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर अर्थात निवृत्ती देशमुख हे विराजमान होते. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांचा हस्ते महाराजांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांचा हस्ते महाराजांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

By

Published : Sep 14, 2019, 3:25 PM IST

Updated : Sep 14, 2019, 5:34 PM IST

अहमदनगर - शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने जिल्ह्यात आले असता संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर उद्योजक संजय मालपाणी आणि प्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर अर्थात निवृत्ती देशमुख हे विराजमान होते. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांचा हस्ते महाराजांचा विशेष सत्कारही करण्यात आला. त्यामुळे इंदोरीकर महाराज आता भाजपात प्रवेश करणार की काय अशी चर्चा होवू लागली आहे.

इंदोरीकर महाराज राजकारणात?

हेही वाचा -अखेर उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ', अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी महाराजांशी हितगुज केले. तसेच याचवेळी व्यासपीठावर मुखमंत्र्यांकडे महाराजांनी त्यांच्या संस्थेकडून पुरग्रस्तांच्या मदतीसाठीचा धनादेश दिला. तर महाराजांना थेट काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात युतीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा ही सुरु झाली आहे.

हेही वाचा -'बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं, पोटच्या पोरावाणी प्रेम केलं, सांगा साहेब काय मिळालं'

त्यानंतर ते व्यासपीठावरुन निघून गेले होते. त्यामुळे त्यांची स्टेजवरील उपस्थिती केवळ मदत निधीदेण्या पुरती होती की काही राजकीय हेतूने हे येणाऱया काळात स्पष्ट होईल. मात्र, नेटकरांना चर्चेसाठी एक नविन मुद्दा मिळाला आहे, हे नक्की.

Last Updated : Sep 14, 2019, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details